पोस्ट्स

IT क्षेत्र खरंच सुरक्षित आहे का?

  TCS मध्ये १४ वर्षं काम केलेल्या मॅनेजरची नोकरी अचानक गेली; Reddit वर मांडली मनःस्थिती बर्‍याच वर्षांपासून भारतात IT sector म्हणजे सुरक्षित नोकरी, उच्च पगार आणि स्थिर करिअर अशी धारणा होती. पण गेल्या काही काळात मोठ्या कंपन्यांमधून होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कपातीने (Layoffs) ही धारणा डगमगायला लागली आहे. अलीकडचीच घटना – TCS मधील एका मॅनेजरला १४ वर्षं काम करूनही अचानक कंपनीतून बाहेर काढण्यात आलं. या घटनेनंतर पुन्हा एकदा IT क्षेत्रातील असुरक्षिततेचा मुद्दा चर्चेत आलाय. Reddit वरचा खुलासा त्या मॅनेजरने आपली कहाणी Reddit वर मांडली. तो तब्बल १४ वर्षं TCS मध्ये काम करत होता. अचानक HR ने त्याला बोलावून resignation दे किंवा termination स्वीकार असं सांगितलं. “इतकी वर्षं काम करूनही शेवटी असा निकाल लागतोय हे अपेक्षित नव्हतं,” असं त्याचं म्हणणं आहे. आयटी क्षेत्रात नेमकं काय घडतंय? Infosys, Wipro, Accenture, Cognizant यांसारख्या दिग्गज कंपन्याही मागील २ वर्षांत मोठ्या प्रमाणावर कर्मचार्‍यांना कमी करत आहेत. Automation, Artificial Intelligence, Global मंदी आणि Cost Cutting यामुळे senior employees सर...